बिहारच्या ऊस मंत्र्यांची कडक भूमिका : हनुमान साखर कारखान्याला कामगारांच्या वेतनासाठी १५ दिवसांची मुदत

पाटणा : ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत मोतीहारी येथील हनुमान साखर कारखान्याच्या ऊस थकबाकीच्या प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी मंत्र्यांनी साखर कारखाना प्रशासनाला कडक इशारा दिला. प्रमोद कुमार यांनी अधिकाऱ्यांना कामगार आणि शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यासाठी कारखान्याची संपत्ती विक्री करण्याचे आदेश दिले. मंत्री प्रमोद कुमार यांनी मोतीहारी साखर कारखान्याच्या प्रलंबित थकबाकी आणि त्यांच्या संपत्तीबाबत पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश दिले.

मोतीहारी साखर कारखान्याची संपत्ती विकून कामगार आणि शेतकऱ्यांच्या थकबाकी भागवण्यासाठी प्रक्रीय केली जाईल असे ऊस मंत्री प्रमोद कुमार यांनी सांगितले. ऊस आयुक्त गिरीवर दयाल सिंह यांनी शेतकरी आणि साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकबाकीबाबत चिंता व्यक्त केली. मोतीहारी साखर कारखान्याचे कामगार संघटनेचे प्रमुख परमानंद ठाकूर यांनी कामगारांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. मंत्र्यांनी महिनाभरात कामगारांचे पगार आणि थकबाकी देण्याबाबत इशारा दिला. मोतीहारी जिल्हा प्रशासनाने साखर कारखान्याच्या संपत्तीच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश त्यांनी दिली. याप्रश्नी २३ ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here