भाकियू लोकशक्ति चे धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच

नजीबाबाद: ऊस थकबाकीबाबत भाकियू लोकशक्ति चे उत्तम साखर कांरखाना बरकातपुर वर अनिश्चित कालीन धरणे प्रदर्शन तीसऱ्या दिवशीही सुरु राहिले. साखर कारखान्याच्या डीएम यांच्या शेड्यूल नुसार गुरुवारी पाच करोड़ रुपये ऊसाचे पैसे जारी केले आहेत.

भाकियू लोकशक्ति चे जिलाध्यक्ष चौ. वीर सिंह यांच्या नेतृत्व मध्ये उत्तम साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन शुक्रवारी ही सुरु राहीले. सहकारी ऊस विकास समिति चे सचिव डॉ. वीके शुक्ल, नायब तहसीलदार राजीव यादव यांनी आंदोलन स्थळी जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी सचिवांना बऱ्याच वेळपर्यंत आपल्या सोबत बसून कारखान्याच्य जीएम ना चर्चेसाठी बोलवण्याचा आग्रह केला. जिलाध्यक्ष चौ. वीर सिंह म्हणाले, शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे मिळेपर्यंत धरणे आंदोलन चालूच राहिल. यावेळी रामकुमार, अर्पण चौधरी, अंबरीश कुमार, पदम सिंह, सुधीर कुमार, योगेंद्र कुमार, संतराम, रणवीर सिंह आदि शेतकरी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here