यशवंत कारखान्याच्या अध्यक्षपदी सुभाष जगताप बिनविरोध

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याची नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी कारखाना कार्यस्थळावर बुधवारी (दि. १७) निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी डॉ. शीतल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीसाठी अध्यक्षपद व उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अनुक्रमे सुभाष जगताप व मोरेश्वर काळे या दोघांचे उमेदवारी अर्ज आल्याने पाटील यांनी ‘यशवंत’च्या अध्यक्षपदी सुभाष जगताप, तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे.

तब्बल १५ वर्षांनंतर थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत हवेली बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने २१ पैकी तब्बल १८ जागा जिंकत कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here