ओटावा : सुक्रो सोर्सिंगने १०० मिलियन डॉलर गुंतवणूक करत दक्षिण ओंटारियोमध्ये कॅनडामधील सर्वात मोठी शुगर रिफायनरी स्थापन करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. सुक्रो सोर्सिंगला अशी अपेक्षा आहे की, नव्या सुविधांसह रिफायनरीची वार्षिक क्षमता १ मिलियन मेट्रिक टन असेल. सुक्रो सोर्सिंगचे संस्थापक आणि सीईओ जोनाथन टेलर यांनी सांगितले की, सुक्रोला कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी पुरवठा साखळीमध्ये सुधारणा आणि नव संशोधन क्षमतेमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही साखर बाजारपेठेत स्थिर, दीर्घकालीन आणि सतत विकासाचा अनुभव येत आहे. आणि सुक्रो बाजारातील या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करीत आहे.
ते म्हणाले की, ओंटारियोमध्ये नवीन रिफायनरी अमेरिकन बाजारातील रिफाईंड साखरेची संभाव्य मागणी पूर्ण करण्यासाठी चांगल्या प्रकारे सज्ज असेल. आणि अमेरिकेतील ग्राहकांना सेवा देण्यासाठी आधीपासूनच सक्रिय असलेल्या सुक्रोच्या एकिकृत पुरवठा साखळीचा वापर करेल.
सुक्रोचे अध्यक्ष डॉन हिल यांनी सांगितले की, सुक्रो अमेरिकेतील संभाव्य निर्यात संधींसह बाजारातील वाढती मागणीच्या आधारावर उत्पादनात वाढ करेल. नवी रिफायनरी २०२५ मध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे.