साखरेचा २७ मे रोजी होणार लिलाव

150

रुडकी: कबालपूर साखर कारखान्याच्या ३५० क्विंटल साखरेचा लिलाव करण्यात येणार आहे. भगवानपूरचे तहसीलदार सुशील कुमार सैनी यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

याबाबतच्या पत्रात म्हटले आहे की, २७ मे रोजी सकाळी अकरा वाजता मेसर्स धनश्री अॅग्रो इक्बालपूर यांच्याकडून थकबाकी न दिल्याने ३५० क्विंटल साखरेचा लिलाव करण्यात येत आहे. तहलीस कार्यालयाच्या परिसरात इच्छूक बोलीकर्त्यांनी उपस्थित राहून लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. लिलाव प्रक्रियेच्या इतर माहितीसह नियम आणि अटींबाबतची माहिती कार्यालयात उपलब्ध आहे असे या सूचना पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here