अंत्योदय लाभार्थ्यांसाठी साखर उपलब्ध

पालघर :

पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील अंत्योदय लाभार्थ्यांसाठी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी 2 हजार 504 क्विंटल एस 30 दर्जाची साखर प्राप्त होणार आहे. सदर साखर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिका धारकांना प्रति शिधापत्रिका 1 किलो या प्रमाणे 20 रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here