पुढील वर्षीही उसाचे उच्चांकी उत्पादन

राज्यात 110 लाख टन ऊस वाढणार : कोल्हापूरात साडे पाच लाख टन ऊस अतिरिक्त

कोल्हापूर, दि. 4 जून 2018 : देशात यावर्षी उसाच्या उत्पादनात उच्चांक गाठला आहे. आता पुढील वर्षीही याच उत्पादनात आणखी भर पडणार आहे. महाराष्ट्रात सुमारे 110 हून अधिक टन आणि कोल्हापूर जिल्ह्यात 5 लाख 50 हजार टन उसाचे उत्पादन वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी सहा हजार हेक्‍टर उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे यावर्षीच्या तुलनेत पुढील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दिड लाखाहून अधिक हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागण झाली आहे.

राज्यातील यावर्षीच्या उसाचे संकट संपता संपेना झाले आहे. चांगला आणि पोषक पाऊस होत आहे. वातावरणही चांगल्या उसासाठी लाभ दायक ठरत असल्याने महाराष्ट्रात पुढील वर्षी म्हणजेच्या म्हणजे 2019-20 मध्ये 1 हजार 80 लाख टन उसाचे उच्चांकी उत्पादन होणार आहे. यावर्षीच्या म्हणजे 2017-18 पेक्षा तब्बल 110 ते 115 लाख टन उस जास्त होणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातही 32 हजार हेक्‍टर उसाचे क्षेत्र वाढले आहे. याशिवाय, उसासाठी समृध्द समजल्या जाणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातही दिडपटीने उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या गळीत हंगामात दिसणार आहे. एक तर साखरेचे दर कमी होतील तसेच उसाचा दर देतानाही तारेवरची कसरत करावी लागले.

महाराष्ट्रात 2017-18 मध्ये 187 कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप केले. या सर्व कारखान्यांनी एकूण 950 लाख 70 हजार टन ऊस गाळप केले. 2019-20 च्या साखर हंगामासाठी 10 लाखाहून अधिक हेक्‍टरवरील उसाचे गाळप अपेक्षित आहे. तरीही, या क्षेत्रामध्ये सध्या सुमारे सव्वा लाख हेक्‍टरने वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्याची चिंता आतापासूनच लागूल राहिली आहे. यावर्षीचा मॉन्सून चांगला झाला. पावसाळ्यानंतर हिवाळा आणि उन्हाळ्यातही पाण्याची कमतरता जाणवली नाही तर मात्र वाढलेल्या उसाचे करायचे काय असा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here