वारणा कारखान्याचा साखर जप्तीचे आदेश

कोल्हापूर : पंचवीस कोटी रुपयांच्या थकीत एफआरपीप्रश्नी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची साखर, मोलॅसिस आणि बगॅस जप्त करून विक्री करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे. ही कारवाई जिल्हाधिकायांच्या देखरेखीखाली होणार आहे.

वारणा कारखान्याने मागील हंगामात तीन मार्च 2019 पर्यंत 88 हजार 506 मेट्रिक टन ऊस गाळप केला असून 25 कोटी 77 हजार रूपयांची एफआरपी थकीत आहे. एफआरपी कायद्यानुसार या रकमेवर 15 टक्के व्याजाची वसुली करण्यात येणार आहे. कारखान्याने एफआरपी थकवली असून यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयाने कारखाना प्रशासनाला ही रक्कम शेतकयांच्या खात्यावर जमा करण्यासंबधी नोटीस पाठवली होती. 2019 – 2020 चा हंगाम सुरू होऊनही कारखान्याने थकीत एफआरपी न दिल्याने अखेर साखर आयुक्त कार्यालयाने वसुलीसाठी पाऊले उचलली आहेत.

साखर आयुक्त गायकवाड यांनी कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस या उत्पादनाची विक्री करून एफआरपीची रक्कम वसूल करावी, असा आदेश काढला आहे. तसेच आवश्यकतेनुसार कारखान्याच्या जंगम, स्थावर मालमत्तेवर सरकारच्या नावाची नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. ऊस (नियंत्रण) आदेश 1966 चे कलम 3(9) नुसार साखर जप्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here