अनलॉकिंग इफेक्ट: हॉटेल आणि रेस्टॉरन्ट उघडल्यापासून साखर विक़्रीत वाढ

नवी दिल्ली : राष्ट्रव्यापी लॉकडाउन दरम्यान साखरेच्या मागणीत घट झाली होती पण आता साखर उद्योगावर अनलॉकिंग चा सकारात्मक परिणाम दिसत आहे. रेस्टॉरन्ट, कोल्ड ड्रिंक, आइस्क्रीम आणि इतर निर्मात्यांकडून मागणीत वाढ झाल्याने भारतात साखरेचा वापर पुन्हा वाढत आहेत.

साखरेंच्या मागणीत वाढ झाल्याने कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. जे कारखाने शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे भागवण्यासाठी संघर्ष करत होते, त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि कॅटरिंग उद्योग भारतात एकूण साखर वापरात चांगले योगदान देतात.

भारतीय शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) यांनी सांगितले की, लॉकडाउन च्या नियमातील शिथिलतेबरोबरच, साखरेची मागणी मे पासूनच होवू लागली. आता देशात अनलॉकिंग सुरु आहे, आणि रेस्टॉरन्ट आणि मॉल्स उघडण्यासाठीही आता अनुमती मिळेल, त्यामुळे साखरेच्या मागणीत अधिक वृद्धी होईल आणि कारखाने जून मध्ये वाटप करण्यात आलेल्या साखरेची विक्री करु शकतील.

उत्तर भारतातील साखर कारखान्यांनी मे साठी दिलेल्या कोट्यानुसार साखर विक्री केली. पण पश्‍चिम आणि दक्षिण भारतातील साखर कारखाने साखर विकण्यात अपयशी ठरले. ज्यामुळे सरकारने मे कोटयाची विक्री मुदत वाढवली आहे आणि जून 2020 साठी 18.5 लाख टन मासिक कोटा दिला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here