तुर्कस्तानमध्ये साखरेचा खप कमी होण्याचे अनुमान

इस्तांबुल : विविध कारणांमुळे तुर्कस्थानमध्ये खाद्य पदार्थ आणि शितपेयांमध्ये साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात, तु्र्कस्थानच्या आरोग्य मंत्रालयाने चॉकलेट, कँडीज, वेफर्स, गोड सॉस, नाश्त्यासाठीचे तांदुळ आणि इतर शीतपेयांमधून साखरेचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्यासाठी साखर कपात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक नियमांनुसार पॅकबंद उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण तसेच रेस्टॉरंट, कॅफेमध्ये याचा वापर किती करावा याबाबत सुचविण्यात आले आहे.

मंत्रालय आणि साखर उद्योगातील प्रतिनिधींनी गेल्या वर्षी या मुद्यांवर एका प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली होती. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केलेल्या सर्व्हेनुसार युरोपीय देशांपैकी तुर्कस्तानमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
साखरेच्या कपातीच्या धोरणामुळे तुर्कस्थानमध्ये साखरेचा खप कमी होण्याची शक्यता आहे. साखर उद्योगाच्या म्हणण्यानुसार, साखरेचा वापर जर योग्य प्रमाणात केला गेला तर त्याचा आरोग्यावर परिणाम होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here