महाराष्ट्रात विक्रमी साखर उत्पादनासह २०२१-२२च्या हंगामाची समाप्ती, जाणून घ्या सर्वकाही

महाराष्ट्राच्या ऊस गाळप हंगामाची जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १३७.२८ एलएमटी (यापूर्वीचे उत्पादन १०६.४० एलएमटी) इतक्या उच्चांकी साखर उत्पादनासह समाप्ती झाली. साखर आयुक्तालयाकडील ताज्या अहवालानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी ९५.२८ टक्के ऊस बिले दिली आहेत. एफआरपीपोटी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ३७,७१२.३६ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. राज्याने आतापर्यंत २०६ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. तर राज्यातील १२७ साखर कारखाने इथेनॉल उत्पादन क्षमतेचा विस्तार करीत आहेत.

जाणून घेऊ साखर हंगामाविषयी :
एकूण साखर कारखाने – २०० (१०१ सहकारी आणि ९९ खाजगी)
एकूण दैनिक गाळप क्षमता – ८०१३०० MT
एकूण गाळप केलेला ऊस – १३२०.३१ LMT
एकूण उत्पादित साखर – १३७.२८ LMT
सरासरी उतारा – १०.४०%
सरासरी गाळप दिवस – १७३
कमाल गाळप दिवस – २४०
किमान गाळप दिवस – ३६

सर्वाधिक ऊस गाळप असलेल्या टॉप ५ मिल
१. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. सोलापूर – २४७८९२२ मेट्रिक टन
२. गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. (जरंडेश्वर शुगर) सातारा – १९९८३३० मेट्रिक टन
३. इंडिकॉन डेव्हलपर्स (श्री अंबिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड) – १९५११६० एमटी
४. जवाहर शेतकरी साखर कारखाना, कोल्हापूर – १९०७२९८ मेट्रिक टन
५. बारामती ऍग्रो लि. पुणे – १७३१०६० मेट्रिक टन

सर्वाधिक साखर उत्पादन करणारे प्रमुख ५ कारखाने
१. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. सोलापूर – २३.४५ लाख क्विंटल
२. जवाहर शेतकरी साखर कारखाना, कोल्हापूर – २३.१३ लाख क्विंटल
३. गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. (जरंडेश्वर शुगर) सातारा – २२.५६ लाख क्विंटल
४. इंडिकॉन डेव्हलपर्स (श्री अंबिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड) – २१.०० लाख क्विंटल
५. मालेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड – १७.३९ लाख क्विंटल

सर्वाधिक साखर उतारा (रिकव्हरी) असलेले ५ कारखाने
१. श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि.- १२.९९%
२. पंचगंगा सहकारी साखर कारखाना लि. – १२.९०%
३. सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड – १२.६६%
४. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि. (युनिट ३) वाळवा – १२.६५%
५. सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सांगली – १२.५४%

सर्वाधिक एफआरपी देणारे पाच साखर कारखाने
१ श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि.- रु.३१३३.४५/टन
२. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि. (युनिट ३) वाळवा – रु.३०४४.२३/टन
३. श्री भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड – रु.३०४३.७३/टन
४. पंचगंगा सहकारी साखर कारखाना लि. (रेणुका शुगर्स) – रु.३०३८/टन
५. सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सांगली – रु. २९७७.६२/टन

इथेनॉल उत्पादन
महाराष्ट्रात २०२१-२२ मध्ये एकूण १३४ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन अपेक्षित आहे. त्याची तेल कंपन्यांना विक्री करून राज्याला ७,८१६.९० कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे.

सह-वीज निर्मिती
राज्यातील साखर कारखान्यांनी वीज विकून २ हजार ४२८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, कारखान्यांनी ३८४.३० कोटी युनिट्स वीज विकन २४२८.७८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये साखर उद्योगाने ६७५.५७ कोटी युनिट वीजनिर्मिती केली. यापैकी ३८४.३० युनिट वीज पॉवरग्रीडला विकली गेली तर उर्वरित २१२.९९ कोटी युनिटचा वापर साखर कारखान्यांनीच केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here