सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ७० लाख टन साखर निर्यातीचा अनुमान

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स एसोसिएशनचे (इस्मा) महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुमारे ७० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. आजवरची ही उच्चांकी निर्यात असेल असा दावा त्यांनी केला.

अलीकडेच इस्माने जारी केलेल्या अहवालात म्हटले होते की, सध्याच्या हंगामात सुमारे २१ लाख टन साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये रुपांतर केले जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी आम्ही सरकारकडून देशभरात १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. सुमारे ३४ लाख टन साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये होईल अशी शक्यता आहे.

इस्माने जारी केलेल्या अहवालानुसार, उत्तर प्रदेशमध्ये उसाची लागण २३.१२ लाख हेक्टर होण्याची शक्यता आहे. तर २०२०-२१ मध्ये २३.०७ लाख हेक्टर होते. इस्माने उसाच्या लावणीसह साखर उताऱ्यातही किरकोळ वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे २०२१-२२ मध्ये इथेनॉलच्या डायव्हर्जनशिवाय ११९.२७ लाख टन होण्याची शक्यता आहे.
इतर प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र २०२१-२२ मध्ये ११ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. २०२०-२१ मध्ये ११.४८ लाख हेक्टरच्या तुलनेत २०२१-२२ मध्ये उसाचे क्षेत्र १२.७५ लाख हेक्टर होण्याची शक्यता आहे. चालू वर्षात मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. तर जून २०२१ मध्ये चांगला पाऊस झाला आहे. इथेनॉलसाठी वापराशिवाय साखरेचे उत्पादन १२१.२८ लाख टन होण्याचा अंदाज इस्माने व्यक्त केला आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here