चालू हंगामात साखर निर्यातीत आणखी २-४ दशलक्ष टनाची वाढ होण्याची शक्यता : ISMA

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (ISMA) अनुमानानुसार, भारतातील साखर हंगाम २०२२-२३ मध्ये साखर निर्यात मर्यादा आणखी २ ते ४ दशलक्ष टनांनी वाढण्याची शक्यता आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. त्यामुळे भारतातून साधारणतः ८ ते १० दशलक्ष टन निर्यात होईल. सद्यस्थितीत भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश असून ब्राझीलनंतरचा द्वितीय क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. भारताने २०२१-२२ या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) ११ दशलक्ष टन साखरेची निर्यात केली होती. केंद्र सरकारने चालू महिन्याच्या सुरुवातीला हंगाम २०२२-२३ साठी पहिल्या टप्प्यात ६ दशलक्ष टन निर्यातीस मंजुरी दिली होती.

इस्माने म्हटले आहे की, भारतात साधारणतः ३६ दशलक्ष टन साखर उत्पादन होईल तर ५ दशलक्ष टन साखरेपासून इथेनॉलचे उत्पादन होईल. देशांतर्गत साखरेचा खप साधारणतः २७ ते २७.५ दशलक्ष टन असेल. निर्यातीसाठी सध्या ८.५ ते ९ दशलक्ष टन साखर शिल्लक आहे असे इस्माने म्हटले आहे. देशातील साखर कारखान्यांनी ४ दशलक्ष टन साखर निर्यातीचे यापूर्वीच करार केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here