ब्राझीलमध्ये जुलै महिन्यात साखर निर्यातीत घसरण

साओ पाउलो : जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि निर्यातदार देश असलेल्या ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन आधी दुष्काळ आणि आता शीत लहरीमुळे घसरणीच्या मार्गावर आहे. ब्राझीलमध्ये कडक ऊन्ह आणि थंडीमुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, ब्राझीलने जुलै २.४६९ मिलियन मेट्रिक टन साखर निर्यात केली. एक वर्षापूर्वीच्या समान कालावधीच्या तुलनेत ही निर्यात जवळपास २५ टक्क्यांनी कमी आहे. २ ऑगस्ट रोजी अर्थ मंत्रालयाने विदेश व्यापार सचिवालयाद्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यातील साखर निर्यातीत १०.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. जुलै महिन्यातील साखर निर्यातीतील महसुलात एका वर्षाच्या तुलनेत १०.७ टक्के आणि जून २०२१च्या तुलनेत १०.८ टक्क्यांची घसरण झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here