यंदा ऑक्टोबर मध्ये साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता

अमरोहा : यंदा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत सर्व साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखर कारखाने आणि ऊस विभाग नव्या गाळप हंगामाच्या तयारीत आहे. साखर कारखान्यांमध्ये दुरुस्तीचे काम सुरु आहे. बेंगलोर, हैद्राबाद, जालंधर येथून मशीन उपकरण बनवले जात आहेत. ऊसाचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे साखर कारखान्यांतील गाळप हंगाम या सत्रात उशिरा संपला.

मे महिन्यापर्यंत साखर कारखाने सुरु राहिले. पण यावेळी साखर कारखान्यांमध्ये वेळेत काम सुरु करण्याबाबत प्रयत्न सुरु झाले आहेत. यामुळे गाळप हंगाम वेळेवर संपन्न होवू शकेल. ऊस विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, यावेळी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व साखर कारखाने सुरु होतील. याबाबत तयारी सुरु झाली आहे. ऊस सर्वेचे कार्य जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. बुधवारपासून ऊस सर्वेक्षणाचे प्रदर्शन सुरु झाले आहे. तीस ऑगस्टपर्यंत या कार्याला पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऊस सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर ऊस खरेदी केंद्रांच्या वाटपाची प्रक्रिया सुरु होईल. सप्ेटंबर चा शेवटचा आठवडा किंवा ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात ऊस खरेदी केंद्रांच्या वाटपाची सूची जाहीर होवू शकते. शेतकर्‍यांच्या मागण्यांनुसार काही ऊस खरेदी केंद्रांमध्ये बदलही होवू शकतो. साखर कारखाने वेळेत चालू झाले तर, ऊस शेतकर्‍यांना यावेळी दिलासा मिळू शकेल. वेळेत गव्हाची लागवड करु शकतील. आगामी गाळप हंगामाच्या तयारीमध्ये व्यस्त असणारे साखर कारखाने, ऊस विभागाचे अधिकारी यांच्या मतानुसार साखर कारखान्यांनी आगामी हंगामाची तयारी सुरु केली आहे. गाळप हंगामापूर्वी मशिन्स दुरुस्त केले जात आहेत. बेंगलुरु, हैद्राबाद, जालंधर याठिकाणाहून मशीन्ससाठी उपकरण मागवण्यात आले आहेत. नव्या हंगामासाठी मशीन दुरुस्तीचे काम सुरु आहे.

जिल्हा ऊस अधिकारी म्हणाले की, ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व साखर कारखान्यांमद्ये गाळप हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न यावेळी कायम राहील. यासाठी आतापासूनच तयारी सुरु आहे. ऊस सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. साखर कारखान्यांमध्ये मशीन दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुरुस्तीसाठी बाहेरुन उपकरण मागवले जात आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here