साखर कारखान्यांना ५० लाख टन निर्यात सक्तीची

561

नवी दिल्ली चीनी मंडी

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असलेल्या भारतात अतिरिक्त साखरेचा साठा मोठा आहे. ही साखर निकालात काढण्यासाठी सरकारने साखर कारखान्यांना ५० लाख टन साखर निर्यातीचे टार्गेट दिले होते. आता सरकारने कारखान्यांना ५० लाख टन साखऱ निर्यत करणे सक्तीचे असल्याचे सांगितले आहे. यंदाच्या हंगामात (ऑक्टोबर २०१८- सप्टेंबर२०१९) ही साखर निर्यात करायची आहे. त्यासाठी अंतर्गत वाहतूक व्यवस्था, भाडे यासारख्या इतर खर्चांची भरपाई देण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.

Download ChiniMandi News Android App

यंदाच्या हंगामात आतापर्यंत भारतातून एक लाख ७९ हजार टन साखर निर्यात झाली आहे. त्यातील बहुतांश साखर श्रीलंकेला रवाना करण्यात आली आहे. त्याचबरोबर एक लाख ५५ हजार टन साखर जानेवारीमध्ये निर्यात होण्याच्या प्रक्रियेत आहे. गेल्या वर्षी साखर कारखान्यांना २० लाख टन साखर निर्यातीचा कोटा दिला होता. पण, कारखान्यांना जेमतेम ६ लाख ७० हजार टन साखरच निर्यात करता आली.

श्रीलंकेला आतापर्यंत ८४ हजार ५३६ टन तर, सोमालियाला १६ हजार ८०१ टन, सुदानला ११ हजार ५५८ टन आणि अफगाणिस्तानला ११ हजार ०१८ टन साखर निर्यात करण्यात आली आहे. तर, सुमारे ४० हजार ५९४ टन साखर इतर देशांना देण्यात आली आहे. इस्माने दिलेल्या माहितीनुसार साखर कारखान्यांनी १० लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. भारतात यंदा ३१५ लाख टन साखर निर्यातीचा अंदाज आहे. गेल्या वर्षी २०१८-१९च्या हंगामात झालेल्या ३२५ लाख टन साखरेपेक्षा यंदाचा अंदाज कमी आहे. देशाच्या बाजारपेठेची गरज २६० लाख टन असताना उत्पादन अतिरिक्त झाले आहे आणि होत आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here