ऑक्टोबरमध्ये सुरु होणार जिल्ह्यातील साखर कारखाने

146

बिजनौर,उत्तर प्रदेश: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची प्रतीक्षा आता लवकरच संपेल. ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होतील. ऊस गाळप हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळेल.

जिल्ह्यामध्ये ऊस सर्वेचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. जवळपास 2 लाख 47 हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र झाले आहे. अशामध्ये जिल्ह्यातील साखर कारखानेही लवकर सुरु होतील . साखर कारखान्यांमध्ये दुरुस्तीचे काम जोरात सुरु आहे. असे मानले जात आहे की, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होतील. डीसीओ यशपाल सिंह यांनी सांगितले की, सर्वात पहिल्यांदा धामपूर साखर कारखाना ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यात सुरु होण्याची आशा आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने वेळेत सुरु झाले तर शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. या दिवसात शेतकर्‍यांसमोर चार्‍याचा फार मोठा प्रश्‍न निर्माण होतो. साखर कारखाने वेळेत सुरु झाले तर हा प्रश्‍न सुटेल. जे कारखाने ऑक्टोबर मध्ये सुरु होणार नाही ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here