साखर कारखान्यांचे वाढणार ऑपरेटिंग मार्जिन 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा

पुणे: चीनी मंडी

साखरेच्या किमतींमध्ये झालेली ७ टक्क्यांची वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या किमतींमध्ये झालेली सुधारणा त्यामुळे निर्यातीची वाढलेली शक्यता यांचा सकारात्मक परिणाम साखर कारखान्यांवर होताना दिसत आहे. यामुळे आता साखर कारखान्यांचे ऑपरेटिंग मार्जिन वाढणार असल्याचे मत क्रिसिल रेटिंग्ज या एजन्सीने व्यक्त केले आहे. साखर कारखान्यांच्या कॅश फ्लोमध्ये ३ हजार ३०० कोटी रुपयांची भर पडणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांची देणी भागवणे शक्य होणार आहे. थकीत देणी १८ टक्क्यांनी कमी होतील, असा अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे.

एजन्सीचे संचालक गौतम साही म्हणाले की, किमान विक्री किंमत वाढविल्यामुळे एकट्या साखर कारखान्याला गेल्या हंगामातील १ ते २ टक्के ऑपरेटिंग मार्जिनच्या तुलनेत २ ते ५ टक्के ऑपरेटिंग मार्जिन मिळणार आहे. त्याचवेळी कारखान्यांची साखळी असलेल्या कंपन्याना ९ ते १२ टक्के ऑपरेटिंग मार्जिनच्या तुलनेत १३ ते १५ टक्के मार्जिन मिळणार आहे. या कारखान्यांना इथेनॉल उत्पादनातूनही मोठा फायदा होणार असल्याचे साही यांनी सांगितले. जगभरात पुढच्या हंगामात साखर उत्पादन घसरण्याची शक्यता व्यक्त झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या हे दर ३ टक्क्यांनी वाढून ३६० डॉलर प्रति टन झाले आहेत. जगातील एकूण साखर उत्पादन ५ तर, सर्वांत मोठा साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमधील साखर उत्पादन १२ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय साखर बाजारपेठ सावरू लागली आहे.

क्रिसिल रेटिंग्जचे संचालक हेतल गांधी म्हणाले, ‘भारतातील निर्यातदारांना याचा फायदा होऊ शकतो. त्यांना प्रति किलो १ रुपयांने फायदो होणार असून, कारखान्यांकडे अतिरिक्त १०० ते २०० कोटी रुपयांचा कॅश फ्लो वाढणार आहे.’ साखरेची किमान विक्री किंमत वाढवल्याने यंदाच्या हंगामात १६ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली ऊस बिल थकबाकी दूर होण्यास निश्चित मदत होणार आहे. गेल्या तीन हंगामात सरासरी थकबाकी ही ९ हजार कोटी रुपयांच्यावरच राहिली आहे, असे गांधी यांनी सांगितले.

किमान विक्री किंमत वाढविल्यामुळे साखर कारखान्यांमध्ये ३२०० ते ३४०० कोटी रुपयांनी कॅश फ्लो वाढणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतीमुळे त्यात १०० ते २०० कोटी रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण कॅश फ्लो ३४०० ते ३६०० कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा एजन्सीचा अंदाज आहे. अगदी छोटे एकच युनिट असणारे साखर कारखानेही यंदा किमान विक्री किंमत वाढविल्याने ब्रेक इवन पॉइंटपर्यंत पोहोचतील, असा अंदाज आहे. यामुळे साखर कारखान्यांना त्यांचा प्रति किलो ३३ रुपये (उत्तर प्रदेश) किंवा ३१ ते ३२ रुपये (महाराष्ट्र आणि कर्नाटक) उत्पादन खर्च काढता येणार आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

1 COMMENT

  1. Sugar mills has already availed funds @ ₹3000/- per qtl. and hence increase in MSP upto 3100/- means mills will get additional ₹85/-only from the increases MSP. Hence by this upward price revision, it will not be possible for the mills to achieve brake even point which is possible only when mills will get sugar price @ ₹3400/- qtl.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here