साखर कारखान्यांनी चौदा दिवसांत ऊस बिले द्यावीत

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मेरठ : चीनी मंडी

बिजनौरचे जिल्हाधिकारी सुजीत कुमार यांनी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना उसाची बिले तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ऊस बिले चौदा दिवसांत द्यावीत, ही मुदत पाळली जावी असे निर्देश त्यांनी दिले असून यात कसूर करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस बिले वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर आलेल्या अडचणी मांडल्या. नियमानुसार उसाची बिले मिळाली पाहिजेत. बिजनौर, चांदपूर, बिलाई, बरकातपूर या साखर कारखान्यांनी ऊस बिले अद्याप न दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जर एखादी बँक कर्ज देत नसेल तर तातडीने दुसऱ्या बँकांकडे मागणी करावी असे निर्देश त्यांनी बिजनौर आणि चांदपूर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना दिले. बिलाई साखर कारखान्याला बँकांसह सरकारकडून कर्ज मिळालेले नाही. या कारखान्याने साखर विकून आणि अन्य मार्गांनी शेतकऱ्यांना बिले द्यावीत.

केंद्र सरकारने कर्ज दिल्यानंतरही बरकातपूर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना चौदा दिवसांच्या मुदतीत बिले दिली नाहीत याबद्दलही जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली. जिल्हाधिकारी म्हणाले की, कारखान्याला आर्थिक मदत मिळाली असताना शेतकऱ्यांना १४ दिवसांत बिले न देणे गैर आहे. कारखान्याने साखरेची विक्री वा अन्य पर्यायांतून शेतकऱ्यांना बिले द्यावीत. चौदा दिवसांच्या मुदतीत बिलांचे वितरण व्हावे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सर्व साखर कारखान्यांकडून चौदा दिवसांच्या मुदतीत ऊस बिले देण्यासंबंधीची पूर्तता केली जाईल असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here