साखर कारखान्यांना डीएमनी फटकारले

122

बिजनौर, उत्तर प्रदेश: डीएम रमाकांत पांड्ये यांच्या कडून बोलवण्यात आलेल्या समीक्षा बैठकीमध्ये बुंदकी, अफजलगढ व स्योहारा कारखान्याने ऑक्टोबर मध्ये शंभर टक्के थकबाकी भागवण्याबाबत सांगितले. डीएम यांनी कारखाना अधिकार्‍यांना फटकारले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये डीएम यांनी सांगितले की, गाळप हंगाम या महिन्यापासून सुरु होत आहे. साखर कारखाना अधिकार्‍यांनी याची पूर्ण तयारी करावी. कारखाना गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे कोणतीही तांत्रिक समस्या येवू नये. सर्व साखर कारखाने ऊस गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी ऊसाची शंभर टक्के थकबाकी भागवली जावी. धामपुर, बरकातपुर कारखान्यांनाही थकबाकी भागवण्याबाबत सांगितले. बिजनोर, चांदपुर आणि बिलाई साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांना फटकारले. त्यांनी सांगितले की, कारखान्याचे अधिकारी जर वेळेत थकबाकी भागवू शकत नसतील तर कारवाईसाठी तयार रहावे. दरम्यान जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या सह साखर कारखान्यांतील सर्व अधिकारी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here