साखर कारखाने मे अखेरीस बंद होणार

127

शामली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम गेल्यावर्षीच्या तुलनेत एक महिना आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ऊस खरेदी केंद्रे बंद होऊ लागली आहेत. वीस एप्रिलपर्यंत ऊन येथील २७ आणि थानाभवन कारखान्याची १८ ऊस खरेदी केंद्रे बंद झाली आहेत. ऊन आणि थानाभवन कारखान्याचा गाळप हंगाम १२ दिवस तर शामली कारखान्याकडे फक्त २० दिवस शिल्लक राहीला आहे.

गेल्यावर्षी शामली साखर कारखाना १२ जून, ऊन कारखाना २० मे आणि थानाभवन कारखान्याने ३० मे रोजी गाळप हंगाम समाप्त केला होता. ऊन कारखान्याने एक कोटी १० लाख क्विंटल उसाची गाळप केले होते. यावर्षी १ कोटी २७ हजार क्विंटल गाळप झाले आहे. ऊन कारखान्याकडे अतिरिक्त सहा लाख क्विंटल ऊसाच्या पावत्या शेतकऱ्यांना जारी करून गाळप सुरू केले आहे. ऊस संपल्याने २७ केंद्रे बंद झाली आहेत. ८७ खरेदी केंद्रांपैकी ६० कार्यरत आहेत. पाच मेपर्यंत हंगाम समाप्त होईल असे कारखान्याचे महा व्यवस्थापक अनिल अहलावत यांनी सांगितले.

थानाभवन कारखान्याने गेल्यावर्षी एक कोटी ५३ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ३० मे रोजी हंगाम समाप्ती केली होती. यावर्षी २० एप्रिलअखेर एक कोटी २९ लाख क्विटंल उसाचे गाळप झाले आहे. थानाभवन आणि ऊन कारखाना ३० एप्रिलनंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाळप समाप्त करतील. शामली कारखान्याने गेल्यावर्षी एक कोटी २० लाख १४ हजार क्विंटल गाळप करून १२ जून रोजी हंगाम समाप्त केला होता. यावर्षी आतापर्यंत एक कोटी क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. कारखान्याकडे आठ ते नऊ लाख क्विंटल ऊस शिल्लक असल्याची माहिती कारखान्याचे उप सरव्यवस्थापक करणपाल सरोहा आणि वरिष्ठ ऊस व्यवस्थापक दीपक राणा यांनी दिली. दहा मेअखेर गाळप पूर्ण होईल. जिल्ह्यातील सर्व कारखाने एक महिना आधी गाळप पूर्ण करतील अशी माहिती डीसीओ विजय बहादूर सिंह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here