बंद पडलेल्या कारखान्यांचे प्रश्न सोडवू: सहकारमंत्र्यांचे आश्वासन

बंद पडलेल्या कारखान्यांचे प्रश्न सोडवू : सहकारमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील बंद पडलेल्या तीन सहकारी साखर कारखान्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

राज्यातील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, कृषीप्रक्रिया संस्था यांना दिलेली शासकीय थकहमी व कर्ज यांची वसुली करण्याचे काम सुरू आहे. सहकार चळवळीतील विविध संस्थांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने शासकीय भाग भांडवल, शासकीय कर्ज, शासकीय हमी दिली आहे. ही थकहमी गोळा करण्याचे काम सुरु आहे. विविध सहकारी संस्थांकडून विहीत रक्कम वसूल केली आहे.

नाशिक जिल्ह्यात बंद पडलेल्या तीन साखर कारखान्यां संबंधित काही मंडळींनीसुद्धा पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच, सहकारी चळवळीतील संस्थांमुळे ग्रामीण अर्थकारण मजबूत होऊन राज्याचा विकास झाला हे नाकारता येत नाही. पण शासकीय भाग भांडवलाची थकबाकी ६३ टक्यांच्या घरात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी आतापर्यंत ११ हजार ३३९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. उर्वरित रक्कमही लवकरच जमा करण्याची कारवाई राज्य सरकारतर्फे सुरू आहे. राज्यातील शेतकरी आणि सहकारी संस्थांबाबत विधान परिषदेतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचनांची राज्य सरकार दखल घेईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here