पिलीभीत : तांत्रिक बिघाडामुळे साखर कारखाना पूर्ण दिवस बंद राहिला. त्यामुळे ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी दिवसभर प्रयत्न करीत होते. मात्र, यश मिळाले नाही. कारखाना बंद पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. शामलीहून इंजिनीअर आल्यावर दुरुस्ती होईल असे सांगण्यात येते.
पूरनपूर आसाम हायवेवर गेल्या दशकभरापासून अतिशय खराब अवस्थेत असलेल्या किसान सहकारी साखर कारखान्याची स्थिती अत्यंत वाईट झाली आरहे. बुधवारी रात्री बॉयलर आणि पॉवर टर्बाईन खराब झाला. पॉवर टर्बाईनमधून कारखान्याला वीज पुरवठा केला जातो. तो पूर्णपणे बंद पडला. कर्मचाऱ्यांनी दिवसभर दुरुस्तीचे प्रयत्न केले. त्यामुळे ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडचणींना सामोरे जावे लागले. वाहनांच्या हायवेवर रांगा लागल्या. भाकियूचे जिल्हाध्यक्ष स्वराज सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याची स्थिती अतिशय बिकट आहे. सरकारने कारखान्याच्या क्षमता विस्तारीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे.