ईराणमध्ये साखर कारखाना श्रमिकांचा संप 60 दिवसांनंतरही कायम

तेहरान: ईराणमध्ये श्रमिकांच्या संपाची आग आता सरकारी कर्मचारी, वैध्यकिय कर्मचारी आणि परिवहन क्षेत्रामध्ये पसरली आहे. हफ्त तपेह साखर कारखान्याचे कर्मचारी आणि एचइपीसीओ ऑटो उद्योगांच्या श्रमिकांच्या संपाला क्रमश: 60 आणि 11 दिवस झाले आहेत, पण त्याचे निराकरण अजूपर्यंत झालेले नाही. एचइपीसीओ ऑटोमोबाईल च्या कर्मचार्‍यांनी कंपनीचे सीईओ यांच्या कडून त्यांच्या सभेत भाग घेणे आणि त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याची मागणी केली आहे.

हफ्त तपेह साखर कपंनीचे आंदोलनकर्ते पुन्हा एकदा शुश शहरामद्ये राज्यपाल कार्यालयाच्या समोर जमा झाले. आंदोलनकर्त्यांनी थकीत पगार आणि नोकरीवरुन कमी करण्यात आलेल्या श्रमिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. तसेच कंपनीच्या खाजगीकरणाचा सक्त विरोध केला. तेहरान बसिंग कंपनी च्या बस ड्राइव्हरच्या एका समूहाने कंपनीच्या कार्यालयाच्या समोर एकत्र होवून चार महिन्यापासून थकीत पगारासाठी आंदोलन केले. इतकेच नाही तर तेहरानसह सात प्रांतांमध्ये, आरोग्य क्षेत्रातील श्रमिकांचा संप सुरु आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here