जसपूरमध्ये दिवाळीनंतर सुरू होणार साखर कारखाना

काशीपूर : ऊस पिक तयार झाल्याने नादेही साखर कारखाना अद्याप सुरू झाला नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापकाची भेट घेतली. कारखाना लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तांत्रिक अडचणीमुळे कारखाना दिवाळीनंतर सुरू केला जाईल असे सांगण्यात आले.

बिजनौरच्या अफजलगड, धामपूर तसेच मुरादाबादमधील ठाकूरद्वारा आदी विभागातील कारखाने सुरू करण्याची तयारी केली जात आहे. जसपूरच्या सीमेवर उत्तर प्रदेशातील हे भाग आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस गाळपास बाहेर नेण्याची वेळ येते. विभागात सर्वत्र ऊस पिक तयार झाले आहे. तसेच गुऱ्हाळघरांवर उसाचे गाळपही सुरू करण्यात आले आहे. मात्र कारखाना सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांनी येऊन व्यवस्थापकांची भेट घेतली.

शेतकऱ्यांनी कारखाना का सुरू झालेली नाही याची विचारणा केली. यावेळी अद्याप कामे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीनंतर ऊसाचे गाळप सुरू होईल. याशिवाय उसाशी संबंधीत सर्व कामांना गती दिली जात आहे. कारखान्याशी परिसरातील आठ हजार शेतकरी जोडले गेले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here