“साखर कारखाना वेळेवर सुरू होणार”

कर्नाल, हरियाणा: नव्याने सुरू होणारा साखर कारखाना वेळेवर सुरू केला जाईल अशी माहिती कर्नाल सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापक आदिती यांनी दिली. कर्नाल कारखाना बंद करण्यात येणार असल्याच्या वृत्ताला कोणताही आधार नाही असे त्यांनी सांगितले.

याबाबत व्यवस्थापक आदिती यांनी सांगितले की उसाचा २०२०-२१ हा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना हरियाणा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कर्नालमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पथकासह आठ फेब्रुवारी रोजी कारखान्याची पाहणी केली होती. जल प्रदूषणाबाबत काही त्रुटी आढळल्या होत्या. साखर कारखान्याने या त्रुटी दूर केल्या आहेत. कारखान्याचा प्लांट जुना असल्याने प्रदूषणाशी निगडीत फ्लोमीटर, टाटलायजर आदी यंत्रणा अद्ययावत राहात नव्हती. त्या सर्व बाबींची दुरुस्ती केली गेली आहे. आगामी गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये रिफाईंड शुगर प्लांट वेळेवर सुरू केला जाईल. याबाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

त्यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखान्याचे गाळप गेल्यावर्षी, २०२०-२१ मध्ये १० नोव्हेंबर रोजी सुरू होऊन १२ एप्रिलपर्यंत सुरू राहीला होता. जुन्या प्लांटद्वारे २८.५८४ क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले होते. २६९९७४ क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. आठ एप्रिल रोजी सुवर्ण जयंती कार्यक्रमात नव्याने स्थापन केलेल्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. नव्याने स्थापन केलेली ३५०० टीसीडी क्षमता रिफाईंड शुगर कारखान्याच्या प्रदूषण नियंत्रणाच्या सर्व मानकांची पूर्तता करते. हा कारखाना सुरू झाल्यानंतर प्रदूषणाबाबतच्या कोणत्याच गोष्टींचा अडथळा येणार नाही. नव्या विस्तारीकरण केलेल्या कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये सुरू होईल. याबाबत सर्व एनओसी कारखान्याला मिळाल्या आहेत. प्रदूषण विभागानेही जनसुनावणी घेतली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here