पाच महिन्यांपासून थकले साखर कामगारांचे वेतन

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

अलीगड (उत्तर प्रदेश) : चीनीमंडी

साथा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच महिन्यांत कारखान्यातील २०० कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. कामगारांना दैनंदिन खर्चासाठी पैसे नाहीत, अशी स्थिती आहे. कामगारांना मुलांच्या शाळेची फी भरणे शक्य झालेले नाही. त्यामुळे मुले शाळेत जाऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. हातावरचे पोट असलेल्या या कामगारांना पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कौटुंबिक स्थिती हाताबाहेर जात आहे.

थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी कामगार नेते शैलेश रावत यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या कामगारांनी अलिगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनही केले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणतेही आश्वासन दिलेले नाही. कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायलाच हवेत. कामगारांची स्थिती हालाकीची आहे. हा गंभीर विषय असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची गरज आहे, असे मत रावत यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांकडून निराशा झाल्यानंतर कमागारांनी राष्ट्रीय लोकदलाचे नेते प्रतीक चौधरी यांची भेट घेतली. त्यांनी आम्ही कामगारांसोबत आहोत आणि त्यांना वेतन मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here