पाकिस्तानमध्ये साखर कारखान्यातील कर्मचार्‍यांचे उपोषण

101

लाहोर : पाकिस्तानातील सिंध साखर कारखान्यातील वर्कर्स फेडरेशनने मंगळवारी संक्रद साखर कारखान्यातील कर्मचार्‍यांना नोकरी द्यावी आणि देय पगार लवकरात लवकर द्यावा या मागणीसाठी रॅली काढून उपोषण केले. साखर कारखान्यांतील श्रमिक इकबाल खान, मशुख चंदियो, खालिद खानजादा, अली मोहम्मद जुनेजो यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांनी आपल्या मागणीसाठी स्थानिक प्रेस क्लब समोर उपोषणाचे आयोजन केले.

सिंध शुगर मिल्स वर्कर्स फेडरेशन च्या नेत्यांनी रैलीला संबोधित करताना सांगितले की, संक्रद साखर कारखान्याचे खाते बंद झाल्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून कर्मचार्‍यांना वेतन दिले जावू शकले नाही. संक्रद साखर कारखाना व्यवस्थापनाने हजारो कर्मचार्‍यांच्या सेवा देखील समाप्त केल्या आहेत, ज्यामुळे कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा आणि उपासमारीचा सामना करावा लागत आहे. सिंध शुगर मिल्स वर्कर्स फेडरेशन ने इशारा दिला आहे की,जर मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर, कुटुंबातील सदस्यांसह आम्ही रस्त्यावर उतरु.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here