थकीत वेतनाच्या मागणीसाठी साखर कारखान्याचे कर्मचारी संपावर

73

सठियाव : जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक युनिट असलेल्या साठियाव येथील दि किसान सहकारी साखर कारखान्याचे कामगार थकीत वेतनप्रश्नी संपावर गेले आहेत. त्यामुळे कारखान्याचे काम बंद पडले आहे. दुसरीकडे कंपनीच्या सर व्यवस्थापकांनी व्यवस्थापनाशी बोलणी सुरू केली आहेत.

किसान सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे संचालन करणाऱ्या इसजॅक कंपनीचे सरव्यवस्थापक बी. के. मिश्रा यांनी सांगितले की सुमारे सहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, मार्च महिन्यापासून एक रुपयाही थकबाकी देण्यात आलेली नाही. साठियाव साखर कारखान्यावर या परिस्थितीमुळे अनिश्चिततेचे ढग घोंघावू लागले आहेत. थकबाकीमुळे कर्मचाऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण हवालदिल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून ऊस गाळपासह को जनरेशन आणि आसवनी प्लांटच्या निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. या सर्व बाबींनंतर सातत्याने घाटा असल्याने व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होवू लागले आहेत. इसजॅकनुसार गळीत हंगाम आणि उर्वरीत कालावधीचा एक – एक कोटी रुपयांसह आसवनी प्लांटची चार कोटी रुपयांची थकबाकी आहे. मुख्य ऊस अधिकारी डॉ. विनय कुमार यांनी सांगितले की, शेतकऱ्यंना ५३.३३ टक्के ऊस बिले अदा झाली आहेत. उर्वरीत ३४ कोटी रुपये लवकरच मिळतील. दरम्यान, सर व्यवस्थापक बी. के. मिश्रा यांनी सांगितले की प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. आणि थकबाकी देण्याबाबत आश्वासनही मिळाले आहे. दरम्यान, जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत काम न करण्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. आणि आंदोलन सुरू ठेवले आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here