पाकिस्तानकडून चढ्या दराने साखरेची आयात

261

कराची : पाकिस्तान सरकारने महागड्या दराने साखर आयात करून सरकारी खजान्याची लूट चालवली असल्याचा आरोप पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी) आणि नॅशनल असेंब्लीच्या सदस्या शाजिया अट्टा मारी यांनी केला आहे. सरकारने १२३ रुपये प्रती किलो दराने साखर आयात करण्याचा घेतलेला निर्णय हा राष्ट्राच्या निधीचे नुकसानच आहे असा दावा त्यांनी आपल्या आरोपात केला आहे.

पाकिस्तानी प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, मारी यांनी सांगितले की, सरकारने साखर ग्राहक उपयोगी केंद्रांवर ८५ रुपये दराने साखर विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मग जादा दराने खरेदी केलेल्या साखरेचे उर्वरीत ३८ रुपये कोणाकडून देण्यात येणार आहेत याचे उत्तर द्यावे. खुल्या बाजारात इतकी महागडी साखर कोणीही खरेदी करणार नाही. इम्रान खान हे आपल्या आर्थिक सल्लागारांना श्रीमंत बनवत आहेत. खान यांनी आर्थिक व्यवहाराशी संबंधीत सर्व मंत्रालयात आणि विभागांमध्ये आपले सल्लागार नियुक्त केले आहेत. देशातील सर्व साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत का ? अशी विचारणाही मारी यांनी केली. इम्रान सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचा आरोप शाजिया यांनी केला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here