साखर उद्योगाला ४ वर्षानंतर चांगल्या निर्यात हंगामाची अपेक्षा

नवी दिल्ली : जागतिक दरातील तेजीमुळे भारताच्या साखर उद्योगाला आगामी २०२१-२२ या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली कामगिरी करता येणे शक्य झाले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) महासंचालक अविनाथ वर्मा यांनी सांगितले की, जर कच्या साखरेचे सध्याचे दर कायम राहीले तर पुढील हंगामात भारत ३०-६० लाख टन साखर निर्यात करू शकतो.

द इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना वर्मा यांनी सांगितले की कच्च्या साखरेसाठी २० सेंट-पाऊंड ही सध्याचा किंमत कच्च्या साखरेसाठी ३१००-३१५० या एक्स मील दरात रुपांतरीत होऊ शकते. कच्च्या साखरेसाठी उत्पादन खर्च कमी येतो. सध्याचे दर हे साखर कारखानदारांना आपला साखर साठा फक्त नफ्यावरही निर्यात करण्यासाठी पुरेसे आहेत. हा दर उत्तर कर्नाटक, महाराष्ट्रातील साखर कारकानदारांसाठी खासकरून उपयुक्त ठरणारा आहे. या राज्यांतील कारखाने बंदरांनजीक आहेत. ते म्हणाले, उत्तर भारतातील कारखान्यांना निर्यातीत पूर्णपणे उतरण्यासाठी हे दर २१ सेंट, पाऊंडवर पोहोचण्याची गरज आहे. साडेचार वर्षानंतर कच्च्या साखरेच्या दराने हा आकडा गाठला आहे. त्यामुळे उद्योग जगताचा उत्साह वाढला आहे.

निर्यातीमधील तेजीमुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच गेल्या काही हंगामातील १०० लाख टनाचा अतिरिक्त साखर साठा कमी होण्याची अपेक्षा आहे. जर ब्राझीलमध्ये इथेनॉलचा सध्याचा ट्रेंड कायम राहीला तर भारतीय साखर उद्योग सरकारकडील अनुदानाशिवाय सुमारे ६० लाख टन साखर निर्यात करू शकतो. आंतरराष्ट्रीय दर घसरल्यास सरकारच्या अनुदानाची गरज भासेल. वर्मा म्हणाले, अशा प्रकरणांमध्ये ३० लाख टन साखर निर्यात अनुदानाशिवाय होऊ शकते. पुढील हंगामा १०० लाख टनपेक्षा कमी अतिरिक्त साखरसाठ्याने सुरू होईल. साखर उद्योगाला ३१० लाख टन साखर उत्पादनाची अपेक्षा आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here