साखर उद्योगाने बायप्रॉडक्ट्सवर लक्ष द्यावे: शरद पवार

154

मुंबई: साखर कारखानदारीने आता इथेनॉल, मोलॅसिस उत्पादनासारख्या बायप्रॉडक्ट्सवर भर देण्याची गरज आहे. त्यातून शाश्वत ऊर्जा निर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, साखर उद्योगाने उप पदार्थांकडे वळण्यासाठी हीच निश्चित वेळ आहे. उसाच्या रसापासून आपण इथेनॉल आणि मोलॅसिस बनवू शकतो, ज्याचा वापर सीएनजीच्या रुपात केला जाऊ शकेल. देशातील वेअर हाउसमध्ये साखरेचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे साखर उद्योगाने आता या क्षेत्रातील बदलांबाबत विचार करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी अधिक संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे असे पवार म्हणाले. सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी हे लक्षात घेतले पाहीजे की, कडाक्याच्या थंडीत कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी कधीची चुकीचा मार्ग निवडणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here