पाकिस्तानमध्ये पेट्रोलपेक्षाही साखर महाग

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये साखरेचा दर पेट्रोलच्या दरांच्या पेक्षा अधिक झाला आहे. देशात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याच्या सरकारच्या धोरणानंतरही विविध शहरांमध्ये साखरेचा दर १५० रुपये प्रती किलो (पाकिस्तानी चलन) झाला आहे. तर पेट्रोल १३८.३० रुपये प्रती लिटर (पाकिस्तानी चलन) दराने विक्री केली जात आहे.
जियो न्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पेशावरच्या घाऊक बाजारात साखरेच्या दरात ८ रुपयांची वाढ झाली. शुगर डिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितले की, साखरेची १४० रुपये प्रती किलो दराने घाऊक विक्री सुरू आहे. तर किरकोळ विक्री दर १४५ रुपयांवरुन वाढून १५० रुपये झाला आहे. यादरम्यान, लाहोरमध्ये काल घाऊक बाजारात साखरेचा दर १२६ रुपये प्रती किलो होता.

कराचीमध्ये साखरेची एक्स मील किंमत आता ऐतिहासिक १४२ रुपये प्रती किलो अशा उच्चांकी स्थितीत आली आहे. कालच्या तुलनेत हा दर १२ रुपयांनी अधिक आहे. जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार, अशीच स्थिती क्वेट्टामध्ये पाहायला मिळाली. तेथे साखरेचा दर १२४ रुपयांवरुन वाढून १२९ रुपये प्रती किलो झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here