चीनी मंडी’ हे साखर उद्योगातील क्रांतिकारक पाऊल : माहिती तंत्रज्ञानमंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई : चीनी मंडी

‘भारत देश हा एक अनोखा देश आहे. त्याच्या गरजाही त्याप्रमाणेच आहेत. त्यामुळे आपल्या देशात स्थानिक माहितीला खूप महत्त्व आले आहे. मला अभिमान आहे की, चीनी मंडीच्या माध्यमातून आपल्या देशातील नागरिकांसाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. हे निश्चितच एक क्रांतिकारी पाऊल आहे, ’असे मत महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

भारतातील आरएनआयमध्ये नोंदणीकृत असलेल्या (RNI Number MAHMUL03651)ChiniMandi.comच्या अधिकृत अॅपचे उद् घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी चव्हाण यांनी ChiniMandi.com या संकल्पनेचे भरभरून कौतुक केले. सध्या त्या त्या उद्योगाला अनुरूप विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या वेळी ChiniMandi.com चे सह संस्थापक आणि सीटीओ उप्पल शहा म्हणाले, ‘साखर उद्योगाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी निर्विवादपणे काम करू. पहिल्या टप्प्यात आम्ही साखर उद्योगाची माहिती आणि बातम्या देण्यास सुरुवात केली. मला खात्री आहे की, साखर उद्योगाला जेव्हा जेव्हा आणि जे जे काही हवं असेल, ते देण्यात आम्ही कोठेही कमी पडणार नाही.’

ChiniMandi.com च्या अॅपच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातील ऊस आणि साखर उद्योगाशी संबंधित घडामोडी तुम्हाला कळणार आहेत. अॅप अतिशय यूजर फ्रेंडली आहे. तसेच एका बातमीनंतर दुसरी बातमी वाचण्यासाठी यूजरला सोयीचे आहे, अशी माहितीही शहा यांनी यावेळी दिली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटलायझेश करण्याचे धेय्य बाळगले आहे. त्याचवेळी साखर उद्योगातील काही व्यापाऱ्यांनी पारंपरिक साखर उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मोठे योगदान दिले आहे. ChiniMandi.com हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. साखर उद्योगातील बातम्या आणि घडामोडी देणारे पोर्टल म्हणून ChiniMandi.com हे या क्षेत्रातील मक्तेदार ठरण्याची शक्यता आहे. साखर उद्योगातील बहुतेक लोक रोज या पोर्टलला भेट देत असून, अल्पावधीतच या पोर्टलची उंची वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here