कोरोना महामारी कमी झाल्यास, साखर बाजारपेठेत सुधारणा: स्यूडज़ुकर सीईओ

305

हॅम्बर्ग: आगामी काळात कोरोना महामारीचा आर्थिक प्रभाव कमी झाल्यानंतर पूर्ण वर्षभ साखर उद्योगाला सर्वात चांगला लाभ होण्याची अपेक्षा आहे असे वक्तव्य युरोपातील सर्वात मोठी साखर रिफायनरी स्युडजुकर SZUG.DEचे सीईओ नील्स पॉर्कसेन यांनी सांगितले. स्यूडज़ुकरच्या ऑनलाइन शेअरधारकांच्या बैठकीत ते बोलत होते. नील्स पॉर्कसेन यांनी सांगितले की, कोविड १९च्या लसीकरणाचा स्तर वाढत असला तरी कंपनी या आर्थिक वर्षात आव्हानांना सामोरी जात आहे. पॉर्कसेने यांनी सांगितले की स्यूडजुकरने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३००-४०० मिलियन युरो उलाढालीची अपेक्षा आहे.

पॉर्कसेन यांनी सांगितले की, रोपांपासून उत्पादित वैकल्पिक प्रोटीन हे आकर्षक उत्पादन आहे. स्यूडजुकर्स या क्षेत्रात आपल्या उत्पादनांचे विस्तारीकरण करणार आहे. आम्ही सद्यस्थितीत व्यवसाय निर्मिती करत आहोत. स्यूडजुकर्सने बिटच्या प्रक्रियेपासून उप उत्पादने आणि धान्यापासून जैव इंधनाचे उत्पादन करून जनावरांसाठी चाऱ्याची निर्मिती करतो. साखर, बायोएनर्जी आणि इतर उत्पादनांसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रावर आधारित कच्च्या मालाच्या क्षेत्रात अधिक संधी असल्याचे सांगण्यात आले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here