नेपाळमध्ये श्रीराम साखर कारखाना बंद पडल्यामुळे ऊस शेतकरी अडचणीत

काठमांडू : रौतहट येथील गरुडा परिसरात असलेल्या श्रीराम साखर कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. कारखान्यात अजूनही ऊस गाळप चालू झालेले नसल्याने व्यवस्थापनाने  कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याची संभावना आहे. शिवाय कारखान्याने शेतकऱ्यांची गेल्या वर्षाची थकबाकी देखील भागवलेली नाही.

या साखर कारखान्याचे उद्घाटन 1992 मध्ये तत्कालीन पंतप्रधान  गिरिजा प्रसाद कोईराला यांनी केले होते आणि गेल्या 27 वर्षापासून हा कारखाना चालू होता. प्रत्येक वर्षीच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये कारखान्याच्या दुरुस्तीचे काम केले जात होते. पण यंदा  व्यवस्थापनाने हे दुरुस्तीचे काम केले नसल्याचा आरोप आहे. यामुळेच कारखान्यात गाळप हंगाम सुरु झाला नाही. जर कारखाना सुरु झाला नाही तर इथल्या हजारो हेक्टर जमीनीत पिकणाऱ्या ऊसाचे काय होणार, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

हा कारखाना 2003 पर्यंत फायद्यात होता, पण गेल्या 16 वर्षांपासून कारखाना नुकसानीत आहे. व्यवस्थापनाने सांगितले की, कारखाना बंद झाल्याने जवळपास 400 कामगार बेरोजगार होतील, शिवाय कारखान्याकडून शेतकऱ्यांचे गेल्या वर्षाचे 40 करोड रुपये ही देय आहेत. याबाबत कारखान्याने कोणतीही अधिसूचना दिलेली नाही असे ऊस शेतकऱ्यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here