पंकजा मुंडेच्या साखर कारखान्याने ऊस शेतकऱ्यांना दिले आश्वासन

1030

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

बीड: चीनी मंडी

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शासनाने आरआरसीचे आदेश दिले आहेत. सर्व शेतकऱ्यांना एफआरपीनुसार लवकरच बिले अदा केली जातील. कारखान्यावर जप्तीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू देणार नाही अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी शेतकऱ्यांना हाताशी धरून कारखान्याची बदनामी सुरू केल्याचा आरोप आघाव यांनी केला आहे.

वैद्यनाथ कारखान्याने यंदाच्या २०१८ -१९ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसापोटी प्रति टन १४०० रुपयांचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला. शेतकऱ्यांना एफआरपीनुसार २००० रुपये मिळणे अपेक्षित आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांना आणखी ६०० रुपये एफआरपी देणे गरजेचे आहे. गेली तीन वर्षे कारखान्यावर अनेक संकटे आली. आर्थिक नुकसान झाले. मात्र, पंकजा मुंडे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आर्थिक संकटात त्यांनी आपल्या आईची जमीन गहाण ठेवून पैसे उपलब्ध करून दिले. कारखान्याच्या नावलौकीक कायम ठेवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. शासनाने वैद्यनाथ कारखान्याला दिलेली नोटीस जप्तीची नसून फक्त आरआरसीची आहे. कारखान्याने ऊस उत्पादकांना १४०० रुपये प्रतिटन बिले दिली आहेत. उर्वरित बिलेही लवकरच मिळतील असे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनीही विरोधकांचा समाचार घेतला आहे. ‘विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. साखर कारखाना काढण्याच्या नावाखाली ज्यांनी गरीब शेतकऱ्यांना लुबाडले त्यांनी वैद्यनाथच्या ऊस उत्पादकांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप करू नये. या निवडणुकीत शेतकरी तुम्हाला धडा शिकवतील’ असे पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here