सिसवां साखर कारखान्याने भागवली थकबाकी

महाराजगंज: आईपीएल साखर कारखाना सिसवा ने जिल्ह्यातील ऊस शेतकर्‍यांचे 2.28 करोड रुपयांची थकबाकी भागवली आहे. हे देय भागवल्यामुळे 200 पेक्षा अधिक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे, तरी अजूनही कारखान्याकडून 19 करोड 10 लाख रुपये थकबाकी आहे. विभागाकडून उर्वरीत देय शेतकर्‍यांना लवकरात लवकर देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

आईपीएल साखर कारखाना सिसवा कडून गेल्या वर्षीच्या हंगामात एकूण 95.99 करोड रुपयांच्या ऊसाचे गाळप झाले होते. कारखान्याकडून यापूर्वीच शेतकर्‍यांना ऊसाचे 74 करोड 60 लाख 78 हजार रुपये देण्यात आले होते. आता तरीही जवळपास 200 पेक्षा अधिक शेतकर्‍यांना दोन करोड 28 लाख 51 हजार रुपये भागवले आहेत. कारखान्याकडून भागवण्यात आलेल्या देयामुळे 25 मार्चपर्यंत ऊसाचा पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.तर आताही उर्वरीत शेतकर्‍यांचे 19 करोड 10 लाख पाच हजार रुपये देणे बाकी आहेत. जिल्हा ऊस अधिकारी जगदीशचंद्र यादव म्हणाले, सिसवा कारखान्याकडून शेतकर्‍यांना पैसे देणे सुरु आहे. जसजशी साखर विक्री होत आहे, तसतसे शेतकर्‍यांचे पैसे भागवले जात आहेत. कारखाना व्यवस्थापनानेही नियमितपणे पैसे भागवणे आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे निर्देश दिले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here