उत्तर प्रदेश: साखर कारखान्याने भगावली ऊसाची संपूर्ण थकबाकी

कुशीनगर: ऊस थकबाकीच्या मुद्याबाबत योगी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व साखर कारखान्यांना ऊस शेतकर्‍यांच्या थकबाकीबाबत चांगलेच धारेवर धरले असून, संपूर्ण थकबाकी दि. 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत भागवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणार्‍या कारखान्यांविरोधात सक्तीची कारवाई केली जाईल. या आदेशामुळे उत्तर प्रदेशातील कारखाने ऊस थकबाकी भागवत आहेत.

त्रिवेणी साखर कारखान्याचे मुख्य प्रबंधक अनिल कुमार त्यागी म्हणाले, 2018-19 या गाळप हंगामातील शेतकर्‍यांचे ऊसाचे मूल्य त्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. ज्या शेतकर्‍यांनी आपल्या बँक खात्याची माहिती कारखान्यांना दिलेली नाही त्यांनी ती त्वरीत द्यावी, जेणेकरुन थकबाकी जमा करणे सोपे जाईल.

त्यागी म्हणाले, साखर कारखान्यांसाठी शेतकर्‍यांचे हितच सर्वाधिक महत्वाचे आहे. यावेळी कारखाना प्रबंधक मानवेंद्र राय, जीएम केन दिनेश राय आदी उपस्थित होते. हाटा कार्यालयानुसार अवध शुगर एन्ड एनर्जी लिमिटेड, न्यू इंडिया शुगर मिल्स ढाढा हाटा चे करणसिंह म्हणाले, 2018-19 या गाळप हंगामात गाळप झालेल्या ऊसाची 38282.78 लाख रुपयांची सर्व शेतकर्‍यांची देणी भागवली आहेत.

अलीकडेच, अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ऊस शेतकर्‍यांची देणी भागवण्याचे निर्देश दिले होते. या याचिकेमध्ये शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, बँकांकडून कर्ज घेवून ऊस पिकवला होता, पण आज शेतकरी हे कर्ज चुकवण्यास असमर्थ आहेत, कारण त्यांना कारखान्यांकडून थकबाकी मिळालेली नाही

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here