बॉयलरची मोटर फुटल्याने साखर कारखान्याचे गाळप बंद

सुल्तानपूर : किसान सहकारी साखर कारखान्याच्या बाॉयलरच्या मोटरचा रात्री अचानक स्फोट झाला. त्यामुळे साखर कारखान्याचे गाळप बंद पडले. त्यानंतर तातडीने उसाचे वजन करण्याचे काम थांबविण्यात आले. यामुळे आता शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अमर उजालामधील वृत्तानुसार, रात्री आठच्या सुमारास गाळप सुरू असताना अचानक बॉयलरच्या मोटर फुटली. त्यामुळे गाळप बंद पडले. या प्रकारामुळे कारखाना प्रशासनात खळबळ उडाली. तातडीने दुरुस्तीसाठी इंजिनीअर्सना बोलावण्यात आले. रात्री उशीरापर्यंत त्यांच्याकडून दुरुस्तीचे प्रयत्न सुरू होते. मोटर पूर्ण उघडल्यानंतर दुरुस्तीच्या कामाचा अंदाज येवू शकेल असे इंजिनिअर्सनी सांगितले. कारखाना बंद पडल्याने उसाचे वजन करण्याचे कामही बंद पडले. त्यामुळे ऊस घेवून आलेले शेतकरी हवालदिल झाले. कारखन्याचे सरव्यवस्थापक प्रताप नारायण यांनी कारखाना लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here