ऊस गाळप करुनच साखर कारखाने होणार बंद

बिजनौर: जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सातत्याने ऊस गाळप करत आहेत. साखर कारखाने ऊस गाळप होण्यापूर्वीच बंद होण्याच्या अफवा पसरल्या आहेत, ज्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गाळप करुनच बंद होतील. बिलाई साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक परोपकार सिंह यांनी सांगितले की, आता कारखान्याने बंद झाल्याची कोणतीही तारीख दिलेली नाही. शेतकऱ्यांना चिंतीत होण्याची गरज नाही. कोरोनामध्ये हॉट स्पॉट वाल्या गावातील शेतकऱ्यांचाही पूर्ण ऊस खरेदी केला जाईल. चांदपूर साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक प्रवीण सिंह यांनी सांगितल्यानुसार कारखाना आता बंद होणार नाही. याबाबत शेतकऱ्यांना किंवा ऊस विभागाला कोणतीही नोटीस दिली गेली नाही. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह म्हणाले, ऊस क्रय केंद्रावर शेतकऱ्यांनी विना पावती ऊस घालू नये. यामुळे ऊस पुरवठा व्यवस्थेत गोंधळ होतो आणि नुकसान शेतकऱ्यांचे होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here