साखर कारखान्यातील अपघातात कामगार मृत्यूमुखी

893

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

सहारनपूर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

किसान सहकारी साखर कारखान्यात झालेल्या अपघातात एक कामगार मृत्यूमुखी पडला आहे. सोमपाल सुरेंद्र कुमार (वय ४०, भनेडा खेमचंद) असे मृत कामगाराचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी, किसान सहकारी साखर कारखान्यात ऊस लोड करणारा ऑफरेटर सोमपाल मशीन वरून उतरताना खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत सोमपालच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर साखर कारखान्याबाहेर आंदोलन करून कारखाना सरव्यवस्थापकांना घेराव घातला. नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी करून, वारसांना नोकरीची मागणी केली आहे. कारखाना सरव्यवस्थापकांनी कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन आणि मृताच्या पत्नीस अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याची ग्वाही दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन थांबवले.

मिळालेल्या माहितीनुसार सोमपालची सायंकाळी सहा ते रात्री दोन अशी कामाची वेळ होती. काम संपल्यानंतर खाली लोडरवरून खाली उतरताना त्याचा पाय घसरल्याने तो कोसळला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डाउनलोड चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here