उत्तरप्रदेश मध्ये साखर कारखान्यातील स्लॅब कोसळून आठ मजूर जखमी

सीतापूर (उत्तरप्रदेश): सीतापूर येथील ठाणा क्षेत्रात सकरन येथील कडबडा गावात बुधवारी सकाळी साखर कारखान्यातील स्लॅब कोसळून 8 मजूर जखमी झाली. अधिक माहितीनुसार, सीतापूर च्या ठाणा क्षेत्रातल्या सकरन येथील कडबडा गावात बुधवारी साखर कारखान्यात मजूर दैनंदिन काम करत होते. याचवेळी कारखान्याचा स्लॅब अचानकपणे कोसळला. छतावर काम करणारे 8 मजूर यामुळे खाली पडले आणि गंभीररित्या जखमी झाले. जखमींना लहरपूर हॉस्पीटल येथे आणण्यात आले. तर एका मजूराला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here