बोनसच्या मुद्यावरुन साखर कारखाना कर्मचार्‍यांचा गोंधळ

शामली: थानाभवनच्या बजाज साखर कारखान्यातील कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांवर कामगारांचे शोषण करण्याचा आणि बोनस कमी दिल्याचा आरोप ठेवून कारखाना परिसरात गोंधळ केला. कारखाना युनिट हेड यांनी आश्‍वासन दिल्यानंतर कर्मचारी शांत झाले. दरम्यान, जवळपास दोन तास कारखान्यातील काम बंद राहिले होते.
थानाभवन बजाज शुगर कारखान्याकडून ऊसाचे पैसे बाकी असल्यामुळे आधीच शेतकर्‍यांच्यात असंतोष आहे. यानंतर आता कारखाना कर्मचार्‍यांचे शोषण करण्याच्या मुद्द्यावरुन अंतर्गत द्वेष बाहेर येत आहे. गुरुवारी बजाज शुगर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी एचआर हेड यांच्यावर शोषणाचा आरोप ठेवला आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांना सणाच्या दिवसात बोन कमी दिल्यामुळेही कर्मचार्‍यांनी गोंधळ केला. कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, इतर सर्व कारखान्यांमध्ये 16800 रुपये इतका दिवाळी बोनस दिला जातो. तर इथे एचआर नी गेल्या दोन वर्षांपासून कारखाना घाट्यात आहे, असे सांगून कर्मचार्‍यांना केवळ सात हजार बोनस दिला आहे.
कर्मचार्‍यांनी कारखान्याचे नुकसान पाहून सात हजार रुपयातही समाधान दाखवले, पण यावेळी देखील कारखान्याकडून केवळ सात हजार रुपये दोन टप्प्यात दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. जेव्हा कारखान्याचे एचआर हेड वाय पी आर्य यांच्याशी कर्मचार्‍यांनी चर्चा करण्याचे ठरवले, तर त्यांचे सांत्वन करणे दूरच, साधे बोललेदेखील नाहीत. या मुद्द्यावरुन संतापलेल्या कर्मचार्‍यांनी मोठा हंगामा केला.
यूनिट हेड वीरपाल सिंह यांनी आश्‍वासन दिले. ज्यावर कर्मचार्‍यांनी त्यांना 24 तासांची मुदत देवून कामाला सुरुवात केली. याबाबत एचआर हेड आर्य म्हणाले, कारखान्यातील काम नियमानुसारच केले जात आहे आणि पुढेही केले जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here