केनिया: साखर कारखान्यांना हवा आहे आयातीवर निर्बंध

121

नैरोबी : साखर कारखानदारांनी केनिया सरकारकडून स्वस्त साखर आयातीवर निर्बंध लावण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, आयातीमुळे साखरेच्या किमतीत 20 टक्क्यांची घट झाली आहे. ऊस कारखानदार असोसिएशन चे अध्यक्ष जयंती पटेल म्हणाले, आयातीत साखरेच्या उच्च मात्रेमुळे दरामध्ये मोठी घट झाली आहे आणि 50 कीलो च्या पोत्यातील साखर ची एक्स फॅक्टरी कींमत डिसेंबर मध्ये एसएच 5,000 पेक्षा कमी होवून एसएच 4,000 इतकी झाली आहे. साखर
संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर मध्ये साखरेची किंमत 5,142 प्रति 50 किलो होती.

साखरेच्या दोन किलोचे पॅकेट, जे नोव्हेंबर मध्ये एसएच200 ला मिळत होते, ते एसएच230 ला मिळत आहे. साखर संचालनालयाने गेल्या वर्षाच्या तुलनेत 2019 मध्ये साखरेच्या आयातीत 61 टक्क्याची वृद्धी केली आहे. संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये आयातीत साखरेची मात्रा गेल्या वर्षातील याच काळात 284,169 टन च्या तुलनेत वाढून 458,631 टन झाली आहे. पटेल यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांमध्ये साखरेची आयात बरीच वाढली आहे आणि यामुळे किमतींवर दबाव पडला आहे. त्यांनी सांगितले की, स्थानीक स्टॉक यामुळेच विकला गेला नाही, कारण ते स्वस्त आयातीचा सामना करु शकत नाहीत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here