पुणे : महाराष्ट्रात अजूनही साखरेचे उत्पादन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यांचे गाळप थांबले आहे. सध्या राज्यात साखरेचे उत्पादन १०९ लाख टनांच्या पुढे गेले आहे. राज्यातील साखरेचे उत्पादनही गेल्या हंगामापेक्षा जास्त झाले आहे.महाराष्ट्रात १७ एप्रिल २०२४ पर्यंत १०६६.८६ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०९३.५५ लाख क्विंटल (१०९.३५ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रातील चालू हंगामात सहभागी २०७ पैकी १९६ साखर कारखान्यांनी मागील हंगामाच्या तुलनेत गाळप थांबवले आहे. तर गेल्या हंगामात १७ एप्रिलपर्यंत सर्व २११ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. चालू हंगामात अद्याप ११ साखर कारखाने सुरू आहेत.
महाराष्ट्रातील विभागवार साखर उत्पादन…
कोल्हापूर विभाग : २७९ लाख क्विंटल
पुणे विभाग: २४८.३७ लाख क्विंटल
सोलापूर विभाग : २०४.८७ लाख क्विंटल
अहमदनगर विभाग: १४०.२ लाख क्विंटल
छत्रपती संभाजी नगर विभाग : ८८.०४ लाख क्विंटल
नांदेड विभाग : १२०.६५ लाख क्विंटल
अमरावती विभाग : ९.३९ लाख क्विंटल
नागपूर विभाग : ३.०३ लाख क्विंटल
साखर रिकव्हरीचे प्रमाण…
कोल्हापूर विभाग : ११.५७ टक्के
पुणे विभाग : १०.५१ टक्के
सोलापूर विभाग : ९.३९ टक्के
अहमदनगर विभाग : ९.९६ टक्के
छत्रपती संभाजी नगर विभाग : ८.९४ टक्के
नांदेड विभाग : १०.२५ टक्के
अमरावती विभाग : ९.४२ टक्के
नागपूर विभाग : ६.५९ टक्के