साखर कारखान्यांनी दिला इथेनॉल मिश्रण वाढवण्याचा सल्ला

लोनी/गाजियाबाद: कोरोना मुळे देशभरात झालेल्या लॉकडाउन मुळे ऊस आणि साखर उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता अनेक ठिकाणी ग्रीन झोन मधील लॉकडाउन संपवण्यात आले आहे. त्याचबरोबर कृषीवर आधारीत उद्योगांना आपले व्यापार सुरु करण्यासाठी अनुमतीदेखील मिळाली आहे. पण तरीही साखर उद्योगासमोर अनेक प्रकारची आव्हाने आहेत. ज्यामुळे उद्योग लवकरात लवकर पूर्ववत करावे लागतील. लॉकडाउनमुळे इथेनॉल बनवणार्‍या कारखान्यांनाही आपेक्षित ऑर्डर मिळू शकल्या नाहीत, ज्यामुळे कारखान्यांसमोर शेतकर्‍यांची थकबाकी भागवणे अशी अनेक आर्थिक आव्हाने समोर आहेत.

देशामध्ये लॉकडाउन दरम्यान इथेनॉल चे उत्पादन आणि वापराच्या मुद्द्यावर बोलताना उत्तर प्रदेशातील लोनी येथील डीसीएम श्रीराम ग्रुप साखर कारखान्याचे प्लांट हेड पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, कोरोना मुळे पूर्ण देशामध्ये लॉकडाउन घोषित झाला होता ज्यामुळे गेल्या दीड महिन्या दरम्यान रस्त्यांवर वाहनांची वाहतुक कमी झाली होती. तसेच पेट्रोलचा वापर ही कमी झाला होता. अशामध्ये कारखान्यांमध्ये इथेनॉलच्या उत्पादनाशिवाय ऑयल मार्केटींग कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत इथेनॉल ची ऑर्डर अत्यंत कमी प्रमाणात घेतली. पंकज सिंह यांनी सांगितले की, यूपी मोठा ऊस उत्पादक प्रदेश आहे. इथे इथेनॉलही अधिक उत्पादित होते. साखर कारखान्यांना यामुळे अतिरिक्त पैसा मिळतो पण यावेळी लॉकडाउन दरम्यान इथेनॉलची मागणी घटल्यामुळे कारखानदारांजवळ अतिरिक्त पैसा मिळण्याची शक्यता कमी झाल्याने उस शेतकर्‍यांना थकबाकी भगावण्यात समस्या निर्माण झाली आहे. पंकज सिंह यांनी सांगितले की, सरकारला अशा स्थितीमध्ये पेट्रोल मध्ये इथेनॉल मिसळण्याची मर्यादा 10 टक्क्याहून वाढून कमीत कमी 13 टक्के केली जावी, यामुळे इंडस्ट्रि ला तर फायदा होईलच तसेच ऑइल कंपन्यांचेही कोणत्याही पद्धतीने नुकसान होणार नाही. जेव्हा आम्ही ऑइल कंपन्यांपर्यंत इथेनॉ्रल पाठवतो तेव्हा या कंपन्या भाडे कमी देतात. या पासून वाचण्यासाठी साखर कारखान्यांनी आपल्या जवळच्या ऑइल कंपन्यांनाच इथेनॉलचा पुरवठा करण्यावर अधिक जोर देत आहेत, जेणेकरुन वाहतुक खर्च होणार नाही. मालाचे भाडे कमी देण्याच्या या समस्येवरही ऑइल कंपन्याना ध्यान द्यावे लागेल.

इथेनॉलच्या मागणीतील कमी आणि याच्या मिश्रणातील वाढत्या प्रमाणावर पेट्रोलियम मंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार वी के शर्मा यांनी सांगितले की, लॉकडाउन मुळे पेट्रोलच्या वापरात कमी आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे इथेनॉल च्या उठावात उशिरा झाला आहे, आता काम गतिशील झाले आहे. जितक्या इथेनॉलची मागणी आहे तितक्या पुरवठ्यासाठी राज्यांतील डिपो मध्ये इथेनॉल मागवले जात आहे ज्यामुळे या अडचणीचे समाधान होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here