साखर कारखान्यांमध्ये 100 खाटांचे अद्यावत कोविड काळजी केंद्र सुरु करावे: जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई

कोल्हापूर : करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ’साखर कारखान्यांमध्ये कोविड काळजी केंद्र सुरु करण्याबाबतची कार्यवाही कोल्हापूर जिल्ह्यात सुरु आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना 100 खाटांचे अद्यावत कोविड काळजी केंद्र सुरू करण्याबाबतचे पत्र पाठवले आहे. जिल्ह्यात 23 साखर कारखाने असून या माध्यमातून आगामी काळात 2300 करोना रुग्णांची सोय होणार आहे.

तहसिलदारांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेंल्या साखर कारखाना प्रशासनाशी संपर्क करुन कारखाना कार्यस्थळावर किमान 100 खाटांचे ऑक्सीजनेटेड सुविधेसह अद्ययावत कोविड काळजी केंद्र तयार करण्यात यावे. ज्या कारखाना स्थळावर कारखान्यांची स्वत:ची जागा उपलब्द नसल्यास तहसिलदारांनी आपल्या स्तरावरुन आवश्यक जागा उपलब्ध करुन द्यावी, याविषयी आपल्या स्तरावरुन खातरजमा करण्यात यावी, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

आगामी ऊस गळीत हंगामासाठी येणार्‍या ऊसतोड मजूर, वाहन चालक यांच्यासाठीही याचा उपयोग होईल, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. ज्या कारखान्यांमध्ये जागेची सोय नाही तेथे तहसीलदारांनी इमारत उपलब्ध करून द्यावी,अशी सूचनाही यामध्ये केली आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांना एक आधार मिळताना दिसत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here