साखर कारखान्यांना ऑक्सिजन प्लान्टच्या यशाची प्रतीक्षा

291

मुंबई : उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यात सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मितीच्या पथदर्शी प्रकल्पाच्या परिणामांची महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना प्रतीक्षा आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर राज्यातील इतर साखर कारखाने राज्यात ऑक्सिजन उत्पादन सुरू करणार आहेत. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे.

हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी होईल, अशी अपेक्षा धाराशीव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केली. कारखान्याने आपल्या इथेनॉल युनिटमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे वातावरणातून ऑक्सिजन मिळवून त्यावर प्रक्रिया करून दररोज २० मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजन उत्पादन करण्यात येणार आहे. मेडिकल ग्रेडनुसार ऑक्सिजन निर्मितीसाठी गरजेनुरुप बदल करण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख, खासदार शरद पवार यांनी कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले होते.

दररोज ६० किलो लीटर क्षमतेच्या इथेनॉल युनीटमधून दररोज २० मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. आगामी पाच ते सहा दिवसांत चाचणी सुरू होईल. उस्मानाबाद जिल्ह्यात १८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. जर ही योजना सफल झाली तर उस्मानाबाद जिल्ह्याची गरज भागू शकते. इतर जिल्ह्यातील कारखानेही आपापल्या जिल्ह्यांची गरज भागवू शकतात.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here