साखर कारखान्यांनी दिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे

बलरामपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयोजित बैठकीत साखर कारखान्यांनी १२ डिसेंबरपर्यंत पुरवण्यात आलेल्या उसापोटी १२ कोटी ६० लाख रुपये देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी बलरामपूर अॅप डाउनलोड करावे असे आवाहन केले आहे.

तुलसीपूर साखर कारखान्याच्या ऊस विभागाचे मुख्य व्यवस्थापक योगेश कुमार सिंह यांनी सांगतिले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्याकडून वेळेवर ऊस बिले देण्यात येत आहेत. ऊस विभागाचे उप महाव्यवस्थापक आर. पी. शाही यांनी शेतकऱ्यांना या हंगामात ऊसाची लागवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी जैविक औषधे, खतांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

साखर कारखान्याच्यावतीने प्रेसमड जैविक खत आठ रुपये प्रती क्विंटल दराने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रेसमड शेतात टाकल्याने ऊसाच्या उत्पादनात वाढ होते अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उसाची चांगली प्रजाती असलेल्या ०११८, १५०२३, ९८०१४ आणि ९४१८४ यांची लागण करावी असे आवाहन करण्यात आले. बजलामपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अॅप डाऊनलोड करावे अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here